‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ हे एक रेवोलूशनरी इन-हाउस विकसित प्रोप्रायटरी क्रेडिट इंजिन आहे, जे बहु-आयामी अक्षावर संपूर्ण क्रेडिट अंडररायटिंग सुलभ करते.
‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ची बीटा आवृत्ती एल अँड टी फायनान्सच्या दुचाकी कर्जाची ऑफर देणाऱ्या देशभरातील निवडक डीलर्सवर तैनात करण्यात आली आहे.
अतिरिक्त दस्तऐवजांच्या किमान गरजेसह, ग्राहकांना आनंदायी अनुभव देत गती देणारे ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ अधिक चांगल्या प्रकारे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास कारणीभूत ठरेल.
‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ एल अँड टी फायनान्समध्ये उत्पादकता आणि प्रक्रिया कार्यक्षमता वाढवताना क्रेडिट जोखीम देखील कमी करते.
मुंबई, १ जुलै 2024, : देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ) ने आज ‘ प्रोजेक्ट सायक्लोप्स’ च्या बीटा आवृत्तीचे अनावरण करत असल्याची घोषणा केली आहे. ‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ हे एक अत्याधुनिक क्रेडिट जोखीम मूल्यांकन आणि स्वयंचलित निर्णय घेणारे डिजिटल क्रेडिट इंजिनरुपी सॉफ्टवेअर असून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या दोन सामर्थ्याचा वापर करते आणि त्याआधारे संभाव्य ग्राहकांची परतफेडीची क्षमता आणि क्रेडिट गुणवत्ता निश्चित करते. ‘ प्रोजेक्ट सायक्लोप्स’ हे उद्योगातील पहिले कंपनीने इन-हाऊस विकसित केलेले रेवोलूशनरी स्वमालकीचे क्रेडीट इंजिन आहे. ते विस्तृत विश्लेषण आणि ऐतिहासिक क्रेडिटच्या माहितीआधारे तयार केलेले एमएल आधारित एन्सेम्बल स्कोअरकार्ड वापरून ब्युरो, खाते एकत्रिकरण आणि पर्यायी ट्रस्ट सिग्नल वापरून ग्राहकांच्या संभाव्यतेचे सखोल मूल्यांकन विविध पातळीवर सुलभ करते.
एलटीएफने 200 निवडक डीलर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून २५ ठिकाणी ‘ प्रोजेक्ट सायक्लोप्स’ ची बीटा आवृत्तीचा वापर सुरु केला आहे आणि त्याचे लक्ष्य या अभिनव डिजिटल पर्यायासह क्रेडिट विषयक छाननीच्या कार्यपध्दतीत क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. एआय-चालित सॉफ्टवेअर प्रगत अल्गोरिदम आणि एआय-संचालित विश्लेषणे वापरते. त्यामध्ये वर्तणुकीचे नमुने, आर्थिक डेटा, लोकसंख्याशास्त्र आणि सामाजिक-आर्थिक चलांसह विविध स्त्रोतांकडून मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण केले जाते.
या प्रसंगी भाष्य करताना, एलटीएफचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सुदीप्त रॉय म्हणाले, “आजच्या विकसनशील डिजिटल विश्वामध्ये, व्यवसाय आणि व्यक्तींसाठी जलद आणि विश्वासार्ह कर्जपुरवठा मिळवणे हे नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. तथापि, पारंपारिक क्रेडिट स्कोअरिंग पद्धती अनेकदा क्रेडिट ब्युरो डेटा आणि मानवी हाताळणीच्या उत्पन्न मूल्यांकनांवर अवलंबून असतात. त्यामुळे अकार्यक्षमता तयार होते आणि विलंब होतो. परंतु पूर्णपणे फायदा होत नाही. आज आमच्या इकोसिस्टममध्ये उपलब्ध डेटाची क्षमता ‘ प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ हे प्रगत अल्गोरिदम आणि एआय-संचालित संदेशांचा वापर करून या समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार केलेले केले आहे. त्यामुळे अनेक पातळींवर मोठ्या प्रमाणावर माहितीवर आधारित कृती करता येतील आणि सध्याच्या क्रेडिट अंडररायटिंगच्या विद्यमान पद्धतीचे तसेच जोखीम आणि क्रेडिट रेलिंग पध्दतींचे पालन सुनिश्चित करताना या पध्दतींना खूप खोली प्रदान केली जाईल.”
‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ सह आम्हाला खात्री आहे की, आमची अंडररायटिंग क्षमता अधिक व्यापक आणि अचूक होणार आहे. त्यामुळे आम्हाला अधिक जलद टर्न-अराउंड-टाइम (TAT) सह माहितीपूर्ण निर्णय लवकर घेता येतील. या आम्ही विकसित केलेल्या स्व: मालकीच्या इंजिनरुपी सॉफ्टेवअरमुळे कंपनीच्या अंडरराइटिंगच्या क्षमतेमध्ये लक्षणीय भर पडणार आहे. तसेच पूर्ण व्यवसायांमध्ये अधिक खोलवर माहिती आणि ज्ञान निर्माण करण्यात मदत होईल,” असा विश्वास श्री. रॉय यांनी व्यक्त केला.
‘ प्रोजेक्ट सायक्लोप्स’ ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे पुढीलप्रमाणे:
प्रेडिक्टिव मॉडेलिंग: ग्राहकांकडून कर्ज थकविण्याच्या संभाव्यतेचा अचूक अंदाज लावण्यासाठी एमएल-आधारित प्रेडिक्टिव मॉडेलिंगचा वापर आणि त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षमता मिळते.
माहितीचे एकत्रीकरण: क्रेडिट ब्युरोची माहिती वैकल्पिक स्त्रोतांसह एकत्रित करते आणि त्यामुळे विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
जोखीम मूल्यांकन: संभाव्य जोखीम ओळखण्यासाठी आणि कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी प्रगत जोखीम मूल्यांकन क्षमतांचा या इंजिनमध्ये समावेश आहे. त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होते.
जोखीम- मूल्यांकन आधारित कर्ज पर्याय: न्यू-टू-क्रेडिट ग्राहकांना जोखीम-भारित विविध कर्ज उपाय प्रदान केले जातात. त्यामुळे रूपांतरणाचा दर सुधारतो आणि आर्थिक समावेशात अशा पध्दतीने योगदान दिले जाते.
‘प्रोजेक्ट सायक्लोप्स’ सारख्या नाविन्यपूर्ण उपायांसह कर्ज मूल्यांकनाच्या विश्वात क्रांती घडवून आणण्यासाठी एलटीएफ वचनबद्ध आहे. एक अधिक कार्यक्षम आणि अचूक प्रणाली एलटीएफ तयार करत आहे आणि ग्राहकांना आणि व्यवसायाला त्यामुळे समान लाभ होणार आहे
Leave a Reply