हा प्रकल्प महाराष्ट्रात क्लेफ्टने प्रभावित असलेल्या वंचित घटकातील मुलांना उचित वेळी उपचार देण्याबाबत जागरूकता निर्माणकरून, विनामूल्य सर्जरीज देण्यात येईल.
महाराष्ट्र, ३ नोव्हेंबर २०२३: स्माईल ट्रेन, क्लेफ्ट केयर साठी काम करणारी जगातील प्रमुख संस्था आणि बजाज फिनसर्व्ह, नावाजलेली वित्तीय सेवा कंपनी ने आपल्या सहभागाने, ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट केयर फॉर एवरी चाइल्ड’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या उपक्रमा अंतर्गत, क्लेफ्ट प्रभावित (टाळू किंवा ओठावरील विसंगती)
असलेल्या मुलांची चाचणी करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, याबाबत महाराष्ट्रात सर्वसमावेशक जागरूकता निर्माण करणे हे या नवीन सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
बाल आरोग्य (Child Health) बजाज फिनसर्व्हच्या सीएसआर कार्यक्रमांमध्ये एक मुख्य क्षेत्र आहे, आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी स्माइल ट्रेनच्या सहाय्याने मागिल 9 वर्षांत 60,000 क्लेफ्ट सर्जरीजचे समर्थन केले आहे. हा नवीन प्रकल्प महाराष्ट्रतल्या क्लेफ्ट प्रभावित बालकांना 8000 सर्जरीद्वारे सर्वसमावेशक क्लेफ्ट केयर उपलब्ध करून देणार आहे.
भारतात, दरवर्षी 35 हजारांपेक्षा जास्त शिशू टाळू किंवा ओठावरील विसंगती घेऊन जन्माला येतात. त्यांपैकी अनेकांना अंधविश्वास, समाजात प्रचलित असलेल्या, गैरसमज किंवा आर्थिक अडचणींमुळे बहुतांश वेळा उपचार मिळत नाही. या समस्यांसाठी उपाय म्हणून या प्रकल्पाने दुहेरी मार्ग निवडले आहे. प्रथम, हा क्लेफ्ट प्रभावित
बालकांची ओळख करेल आणि स्माइल ट्रेनच्या हॉस्पिटलच्या नेटवर्कद्वारे त्यांना समयोग्य सर्जरीज पुरवेल. या उपक्रमाचा दुसरा पहलू म्हणजे क्लेफ्ट विषयी जागरुकता वाढवणे आणि जन्मतः टाळू किंवा ओठावरील विसंगती संबंधित पालक आणि नागरिकांना शिक्षित करणे हा आहे. हे काम करण्यासाठी स्माइल ट्रेन बरोबर स्वास्थ्य सेवक, समाज सेवक, AMOGS (एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र ओब्स्टेट्रिक आणि जिनेकॉलॉजिकल सोसायटी) पीडियॅट्रिक असोसिएशन, आणि एनजीओ इतद्यदिंचा समावेश असेल.
स्माईल ट्रेनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका ममता कॅरोल यांनी जन्मतः या समस्येने त्रस्त असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने दाखविलेल्या समर्पित स्वारस्याबद्दल कंपनी आणि त्यांच्या व्यवस्थापनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “सतत्यने बालकांना क्लेफ्ट उपचार देणे
हे स्माईल ट्रेनचे ध्येय आहे. टाळू किंवा ओठावरील विसंगती वैद्यकीय उपचाराच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते, आणि अशे मुल स्वस्थ जीवन जगू शकतात. ह्या संदर्भात, ‘महा स्माइल्स’च्या सहाय्याने समाजातील सर्व घटक सर्व वर्गांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या उद्देश्यात आहे. बजाज फिनसर्व्ह सोबतची आमची भागीदारी अशा मुलांना निरोगी आणि पूर्ण आयुष्य सहज आणि सुखदपणे जगण्यास मदत करते.”
बजाज फिनसर्व्हच्या सीएसआर स्टीरिंग कमिटी अध्यक्षा शेफाली बजाज या भागीदारीबद्दल बोलताना म्हणाल्या, “आमच्या सीएसआर कार्यक्रमातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मुलांसाठी समग्र आरोग्य सेवा प्रदान करणे आणि त्यात, क्लेफ्ट केअर हे आमच्या प्रमुख ध्येय आहे. ‘महा स्माइल्स’ उपक्रम द्वारे क्लेफ्ट केअर साठी एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले आहे जे महाराष्ट्रातील विशिष्ट भागात सुरू होईल आणि नंतर राज्याच्या विविध प्रदेशांमध्ये राबविला जाणार आहे. हे साध्य करण्यासाठी, स्माईल ट्रेनच्या सहाय्यातून आम्ही समाजात जागरूकता वाढविणार आहे. त्याचबरोबर अधिकाधिक क्लेफ्ट शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार, विविध एनजीओझ आणि बाल संघटनां देखिल मदद करणार आहे. जर या उपक्रमातून सकारात्मक बदल घडला, तर हाच दृष्टीकोन इतर राज्यांमध्ये अवलंबिला जाऊ शकतो आणि त्यामुळे गरजवंत प्रत्येक मुलामुलीसाठी क्लेफ्ट केअर उपलब्ध होऊ शकते.
वरिष्ठ प्लास्टिक सर्जन आणि स्माईल ट्रेनचे सहयोगी डॉक्टर नितीन मोकळ या उपक्रमाबद्दल आपले अनुभव व्यक्त करताना म्हणाले, “महा स्माइल्स हा प्रकल्प जन्मतः टाळू किंवा ओठावरील विसंगती असलेल्या मुलांसाठी महाराष्ट्रात महत्त्वाचा उपक्रम आहे. बालकांना उपचाराचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी या व्याधींवर वेळेत उपचार करुन घेणे आवश्यक आहे. व्याधीग्रस्त बालके लवकर शोधण्यासाठी आणि तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची क्षमता वाढवणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे. तसेच हा उपक्रम अग्रस्थानी असलेल्या सेवकांना आवश्यक ज्ञान आणि प्रशिक्षणाने सुसज्ज करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे क्लेफ्ट व्याधीग्रस्त अपत्यांचा जन्म आणि त्यानंतर त्यांच्यावरील प्राथमिक उपचार यातील खूप मोठे अंतर कमी होईल.”
मोफत आणि वेळेवर क्लेफ्ट केअरची सोय मिलवण्यासाठी क्लेफ्ट-ग्रस्त कुटुंबांनी ह्या स्माईल ट्रेनच्या टोल-फ्री- १८०० १०३ ८३०१ नंबर वर संपर्क साधावा. ही हेल्पलाइन गरजूंना परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देईल.
Leave a Reply