#स्वाईप ॲण्ड सेव्ह: बँकिंग सुविधेचे नवीन युग
कार्डधारकांना मिळणारे लाभ अधोरेखित करताना मास्टरकार्डचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव गुप्ता म्हणाले, “या नवीन कार्डाच्या शुभारंभासाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेसोबत सहकार्य करताना मास्टरकार्डला अतिशय आनंद होत आहे. प्रवास, भोजन, ऑनलाइन फूड वितरण, इलेक्ट्रॉनिक्स खरेदीपासून ते दैनंदिन किराणा खरेदीपर्यंत, मास्टरकार्ड डेबिट कार्ड कार्डधारकांना प्रत्येक व्यवहारासाठी बक्षीस देणार आहे. या कार्डात एक आर्कषक असा लॉयल्टी प्रोग्रामसुध्दा आहे आणि तो सर्व विभागांमधील वापरकर्त्यांना आकर्षित करेल. बँकांशी सहयोग करण्यासाठी आणि रोमांचक अशी आर्थिक उत्पादने आणि योजना देण्यासाठी मास्टरकार्ड सदैव वचनबद्ध आहे.”
मुंबई, 3 जानेवारी 2024ः भारतातील आघाडीची एसएफबी असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने मास्टरकार्डबरोबर भागीदारी करत मास्टरकार्ड डेबिट कार्ड सुविधा आणत असल्याची घोषणा केली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट पगारदार ग्राहकांसाठी प्रामुख्याने हे कार्ड तयार करण्यात आलेले असून स्वाईप अॅण्ड सेव्ह (#Swipe&Save) या योजनेंतर्गत ते बाजारात आणण्यात आले आहे.
नवीन मास्टरकार्ड डेबिट कार्ड आजच्या कॉर्पोरेट पगारदार वर्गाच्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करते. त्यामध्ये वरिष्ठ श्रेणीतील विविध स्तरांसाठी विशेष योजना सादर करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, मनोरंजन ऑफरमध्ये बूकमायशो (BookMyShow) आणि पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडवर (PVR INOX Limited) चित्रपटाच्या तिकिटांवर 20 टक्के सवलत समाविष्ट आहे, तर भोजनाच्या ऑफरमध्ये ईझी-डिनर (EazyDiner) आणि झोमॅटोवर (Zomato) 15 टक्के सवलत आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन फूड वितरणासाठी, स्विगीवर (Swiggy) 30 टक्के सवलत आणि झोमॅटोवर थेट १०० रुपयांची सवलत आहे. बिगबास्केट आणि बिबीनाऊच्या (bigbasket आणि bbnow) योजनांतून ग्राहक किराणा मालाच्या खरेदीवर बचत करू शकतात. मास्टरकार्ड डेबिट कार्डधारक यात्रा (Yatra ) आणि ixigo सह प्रवासासाठीच्या बुकिंगवर 15 टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाइन खरेदीसाठी, ॲमेझॉन फॅशन(Amazon Fashion) आणि TATA CLiQ Luxury तर्फे ग्राहकांना झटपट अशी १० टक्के सवलत दिली जाणार आहे, तर आरोग्य आणि फिटनेस ब्रँड फार्मइझी (Pharmeasy) थेट 10 टक्के सवलत कार्डधारकांना देणार आहे.
स्वाईप अॅण्ड सेव्ह ही योजना केवळ व्यवहारांवरच नव्हे तर प्रत्येक स्वाइपच्या माध्यमातून होणाऱ्या मूर्त बचतीवर भर देते. या धोरणात्मक वाटचालीतून एयू स्मॉल फायनान्स बँक (AU SFB) ने भारतातील तीन प्रमुख कार्ड नेटवर्कशी यशस्वीरित्या सहकार्यात्मक भागीदारी करत आर्थिक परिघात एक आघाडीचा सर्वसमावेशक खेळाडू म्हणून स्वतःचे बळकट असे स्थान निर्माण केलेले आहे.
मास्टरकार्ड डेबिट कार्डच्या या योजनेत अनेक आकर्षक लॉयल्टी योजनांचा खजिना भरलेला आहे. कारण कार्डधारकांना अधिकाधिक बक्षीस प्रदान करण्यावर भर असून बँकिंग हे केवळ खर्च करण्यापुरते नाही, तर नफा मिळविण्यासाठी देखील आहे, ही संकल्पना रुजविण्यात आलेली आहे. या डेबिट कार्डासोबत असलेल्या आकर्षक योजना ग्राहकांना अनुभव संपन्न करते, त्याचबरोबर अनेक श्रेणींचा समावेश असलेल्या नानाविध योजनासुध्दा सादर करते. उच्च खरेदीची मर्यादा विविध गरजा पूर्ण करते आणि त्यातून एयू एसएफबीच्या ग्राहकांना लवचिकता आणि सक्षमतासुध्दा प्रदान करते.
मास्टरकार्ड डेबिट कार्डच्या शुभारंभप्रसंगी एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिब्रेवाल (Tibrewal) या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणाले, “ग्राहक-केंद्रित बँक बनण्याच्या या प्रयत्नांत, आमच्या ग्राहकांना विविध प्रकारचे लाभ प्रदान करण्यावर आमचा भर आहे. मास्टरकार्ड डेबिट कार्डचा शुभारंभ हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण तीन प्रमुख कार्ड नेटवर्कसह डेबिट कार्डसाठीच्या विविध योजनांचे परिघ पूर्ण करते. आम्ही आमच्या पगारदार ग्राहकांना ही खास योजना देऊन सुरुवात करत आहे आणि ही भागीदारी लवकरच अन्य उत्पादनांपर्यंत विस्तारित होईल. तसेच ही भागीदारी सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि लाभदायक असा बँकिंग अनुभव सुनिश्चित करेल. मास्टरकार्डबरोबरील आमचे हे सहकार्य निव्वळ भागीदारीपेक्षासुध्दा खुप अधिक आहे; कारण प्रत्येक स्वाईप आणि सेव्ह क्षणाशी जोडल्या गेलेल्या आमच्या ग्राहकांचे आर्थिक कल्याण वाढवण्याची ही वचनबद्धता आहे.”
Leave a Reply