युनिट लिंक्ड टर्म विमा योजनेत वार्षिक प्रीमियमच्या १०० पटपर्यंत विमाकवच
ट्युलिप योजनेचा प्रमुख उपयोगः
1) वार्षिक प्रिमीयमच्या तुलनेत 100 पट विमा कवच
2) कंपनीने समाविष्ट केलेल्या परिपक्वता लाभांतर्गत फंड मूल्याच्या 30 टक्के लॉयल्टी अॅडिशन केले जाणार
3) 10, 11, 12 आणि 13 व्या वर्षी प्रिमीयम अॅलोकेशन शुल्काच्या दोन पट परतावा
4) पॉलिसीच्या 11 व्या वर्षापासून मोरटॅलिटी शुल्काच्या 1 ते 3 पट परतावा
5) वित्तीय आप्तकालीन स्थितीत योजनेतून पैसे काढण्याची लवचिकता
6) अपघाती मृत्यू लाभ आणि गंभीर आजारात सहाय्य
7) गुंतवणूकीसाठी आठ फंडाचे पर्याय गुंतवणूकदारांना मिळणार
मुबई, ता. २० डिसेंबर 2023 : कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“कोटक लाईफ”) ने आज ट्युलिप (T.U.L.I.P) ही युनिट लिंक्ड आधारित टर्म विमा योजना गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा केली. ट्युलिप हा युनिट लिंक्ड संबंधित टर्म विमा योजना असून ती ग्राहकाला युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) प्रमाणे परतावा मिळवण्याची संधी देते. त्याचबरोबर वार्षिक प्रीमियमच्या 100 पट पर्यंत विमा कवच (लाईफ कव्हर) देते. ही योजना गंभीर आजार आणि अपघाती मृत्यूपासून अतिरिक्त संरक्षण देखील विमाधारकास प्रदान करते.
कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमण्यम या योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले, “ग्राहक केंद्रित धोरणाला कोटक लाईफचे सर्वोच्च प्राधान्य असून ते आमच्या डीएनएमध्ये भिनलेले आहे. ट्युलिप आमच्या ग्राहकांना टर्म प्लॅनप्रमाणेच सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते, त्याचबरोबर युलिपप्रमाणे त्यांची संपत्ती वाढवण्याची संधी देखील देते. आमच्या ग्राहकांच्या मुख्य आर्थिक गरजांची काळजी घेणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.”
व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने ट्युलिप हे एक पाऊल आहे. ‘हम हैं… हमेशा’, या आमच्या ब्रँड वचनाशी सुसंगत आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत असण्याची हमी यातून देतो.
Leave a Reply